Thursday, October 24, 2013

Kavita - Ek quarter kamich padate

कवितेचे नांव :

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते !

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही ��

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते... 

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते 
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो 

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते... 

पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात 

शेवटी काय, दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते... ��

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे 
देवदासचे खरे प्रेम पारो, की दारु ?
याचा मला अजून संशय आहे

प्रत्येक पेग मागे "ती"ची
आठवण दडली असते 
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते ��

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते ! ��

चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात ��
सगळे जण मग त्यावर
P.H.D. केल्यासारखे बोलतात 

प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते 

जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते ! 

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही ��
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
पिझ्झाशिवाय खात नाही ��

पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात 
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात 

रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते ! ��

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते 

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...

परंतु दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !! 

Friday, October 11, 2013

Funtoon - Sachin Retires

Miss you Sachin. It will take time to rub-off Sachin-habit.

Friday, October 4, 2013

Tortoise & Rabbit - The story continues

Tortoise and a Rabbit wrote an entrance exam, Tortoise got 80%, Rabbit got 81%.

Both went 4 admission to an engineering college,

Cut off needed was 85%.

Rabbit didn't get admission ,but the tortoise got admission.

How?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.U remember when we were in the 1st std the tortoise won a race.

Sports quota 5% marks extra :-

tortois rocks.....

Tuesday, October 1, 2013

Assal Puneri

Puneri aajicha tadakhaa--

Mii signal la thamblo hoto mobile var watsapp karat. Signal green jhalela kalala nahi, tyamule tasach thambalo hoto....shejari rasta cross karnyasathi ubhya aslelya Aajibai agadi puneri tone madhe mhanaly
'Punyatale signal hyahun hirawe hot nahit, nigha ata'

-----------------


Bhaajiwala khup vel bhaajivar pani shimpdat asto.
Shevti samor vat pahnari ek assal puneri bai mhante..
.
.
.
Bhendi shuddhivar ali asel tar 1 kilo dya

-----------------

Assal PUNERI....

Ek mulga karve road var bike jorat chalvat hota..
Ajoba tyala bolle "Karve.. aramat chalva"..

Mulga ragaane bolla "Mi Karve nahi"..

Ajoba bolle "Ohh sorry mala vaatla baapacha rasta ahe tumachya"