Friday, October 10, 2014

Puneri Flipkart

flipkart चा उगम जर पुण्यात
झाला असता तर…
१. वेबसाईट सकाळी ९ ते दुपारी १.३० व
सायंकाळी ५ ते रात्री ८.३० पर्यंतच
चालू असेल.
२. खरेदी करायची नसल्यास logout करावे, उगाच हे बघ ते बघ करत करत बसू नये.
server वरती लोड येतो, तो crash
झाल्यास तुमच्याकडून दंड आकारण्यात
येइल.
३. एकदा click केलेली वस्तू परत
घेतली जाणार नाहि. ४. खरेदी करण्याआधी पूर्ण रक्कम
द्यावी. cash on delivery सारखे बिन
भरवश्याचे व्यवहार आम्ही करत नाहि.
५. wishlist मध्ये ३ पेक्षा जास्त वस्तू
टाकू नयेत.
६. sale च्या दिवशी तुम्हाला हवी असलेली वस्तू
न मिळाल्यास आम्ही जबाबदार
राहणार नाहि. उगाच नंतर facebook
आणि twitter वर नाराजी चे स्वर उमटवू
नयेत.
७. एखादी वस्तू आमच्यापेक्षा दुसरीकडे स्वस्त मिळत असेल तर ती तिकडून
खुशाल घ्यावी, उगाच आम्हाला त्यांचे
उदाहरण देऊ नये.
८. वरील सगळ्या आणि आणखी बर्याच
conditions apply.