सिग्नल तोडू नका यासाठी पुणेरी पाटी.....
'लाल रंग बघितल्यावर जनावरे उधळतात, माणसे शांत उभी राहतात. तुम्हीच ठरवा तुम्ही कोण.'
सिग्नल तोडू नका यासाठी पुणेरी पाटी.....
'लाल रंग बघितल्यावर जनावरे उधळतात, माणसे शांत उभी राहतात. तुम्हीच ठरवा तुम्ही कोण.'
Problem of plenty
एकाच कपाटात मावत पाच जणांचे कपडे
भिंतीवरच्या मांडणीत डबे, पातेली, कुंडे
हल्ली मात्र सामानाने भरून वाहताहेत घरटी
आवरता आवरता प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty
फार पूर्वी नव्हतीच म्हणे चपला घालायची पद्धत
नंतर घरात जेवढी माणसे, तेवढेच जोड दिसत
घेतो नवे जोड हल्ली प्रत्येक ऑकेजन साठी
घालू कुठले ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty
ज्याच्या घरी फोन, त्याला नसे आराम
लेंडलाईन एक, करी सार्यांचे काम
हल्ली एका मोबाईल मध्ये तीन सीम ची घंटी
घेऊ? नको? ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty
घरी एक टीव्ही, एकच फक्त दिसे दूरदर्शन
मोजकेच कार्यक्रम पण त्यांचे मोठे आकर्षण
विश्वरूपदर्शन होते आज सर्व चैनल वरती
काय पाहू ठरवताना प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty
उंचावतो राहणीमान आपण वाढता मिळकत
थोडीही गैरसोय मग मुळीच नाही खपत
चिडचिड नि ताण तणावाच त्याने वाढतात शेवटी
समाधान शोधता शोधता प्राण येतो कंठी- आपल्याही घरात problem of plenty
कमी असतानाही घरात होते समाधान
नवे काही मिळता आनंदाला येई उधाण
भूतकाळाच्या आठवणींनी आपण होतो senti
कालचक्राची चाके आता फिरतील का उलटी? - आपल्या घरात आता problem च plenty
Hass..!!!!!...naa... mana.... hai..?????????
Posted by Nandulal Dute on Tuesday, April 14, 2015