दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरू पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...
दु:ख म्हणाले "दोस्तांनो!!"
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!!
मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...
मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेंव्हा
जत्रेत गेलो होतो...
गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!!
तेंव्हा पासून फिरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कोनाच्या ही नजरेत...
सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दुःख ढसाढसा रडले!!
नशा सगळ्यांची उतरली
दुःखाकडे पाहून!
दुःखालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...
सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुध्दा फिरतोय
दुःखाला शांत करायाचा
खूप प्रयत्न करतोय...
जीवनाच्या रथाचे
आहेत सुख-दुःख सारथी
सुख मिळाले तर दुःखाच्या घरी
मीच देईन पार्टी!!
No comments:
Post a Comment