Monday, August 2, 2010

निबंध | Marathi Essay

निबंध

Here is the collection of some funny essays. 
Enjoy!!!


निबंध- 'गाय'



अमेरिकेत मुलाला 'गाय' म्हणतात. भारतात गवत खाणाऱ्या प्राण्याला 'गाय' म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते. गाई फ़ावल्या वेळेत शेपटीने माश्या मारतात. गाई गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो. गाईच्या 'शी' ला शेण म्हणतात‌. शीलाताई शेणाच्या गौऱ्या करते. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात. वसुबारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.पूजा मला फ़ार आवडते. ती माझ्या शेजारी बसते.

पुढचा विषय "बैल" लिहा बरं!!!

"bail" is similar to 'gaay' except for a small difference.....'bail' being a breadwinner of their family goes out works in farm while 'gaay' stay at home. wagh eats bail so write next essay on wagh.

वाघ जंगलात राहतो. Mr.वाघ आमच्या सोसायटीत राहतात. पण Mrs.वाघांसमोर ते गरिब 'गाय' आहेत. वाघ डरकाळ्या फ़ोडतो. Mrs.वाघ नाही डरकाळ्या फ़ोडत पण Mr.वाघांवर गुरगुरतात. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. Mr.वाघ चट्टेरी-पट्टेरी शॉर्ट (घरात असताना) घालतात. वाघ शिकार करतो. शिकार केल्यानेच वाघांच्या जाती नष्ट  होत आहेत. जातिभेद नष्ट केले पाहिजेत पण वाघ टिकले पाहिजेत. वाघाने पोपट पळला आहे.........म्हणजे Miss नाजूका वाघ ने (वाघांची सुकन्या) पोपट पाळला आहे.

पुढचा विषय पोपट!!!

पोपट हा पाळीव पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा असतो.त्याला एक चोच असते. नर जातीला बडबड करण्याची संधी मिळालेला एकमेव भूवासी आहे असं शेजारचे काका हळूच म्हणताना परवा ऐकले. (कोकिळ गात असुनही कोकिळा गाते असा गैरसमज आहे तसाच हा ही असावा असा अंदाज आहे असही काहिस पुढे म्हणाले.) पोपट मिरची खातो. त्यामुळे त्याची चोच लाल असते.

शेजारच्या गोरे काकांना काळा मुलगा झाला तेंव्हा त्यांचा पोपट झाला असे सगळे म्हणत होते. कावळा झाला असं म्हणायला पाहिजे होत असं मला वाटल. पण लोकांच्या पोपटपंची पुढे मी काय बोलणार.

पुढचा विषय 'कावळा'!!!

कावळा पाळीव पक्षी नाही. हा अन्याय आहे. कावळ्याने कोणाचे घोडे मारले आहे की, त्याला पाळत नाहीत ! मी पाळत नाही कारण मला टक्कल आहे,तो चोच मारेल अशी भीती वाटते. कावळा ओरडत नाही,कोकलतो किंवा कावकाव करतो.त्याच्यावर 'पैलतोगे काउ कोकताहे'- हे गाणे लिहिले आहे. परदेशातही तो असाच ओरडतो.(हे पाहून म्हणजे ऐकून पू.लं. ना देखिल खुप आश्चर्य वाटले होते). माणसाच्या कोकलण्याला काही ठिकाणी कावकाव म्हणले जाते. कावळा शक्यतो काळ्या रंगाचा असतो.मराठीत काळ्या बारोबर नेहमी कुळकुळीत हा शब्द येतो. कावळ्याला कितीही वाईट बोलले तरी शेवटी त्याच्या शिवाय मुक्ती मिळत नाही.


No comments:

Post a Comment