फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती ..
१. फेसबुक कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.
३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता
टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या
चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली
नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधी येत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि
उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या
मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर
कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या
लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत
असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.
१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी
पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.
तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता...??
No comments:
Post a Comment