Sunday, September 8, 2013

Marathi Poem - Thoda break haway yaar

थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.
धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार.
किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.
ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसे सुख्ख हवेय,
घास सुख्खाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठेय.
आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.
future च्या plans मुळे
present वरच पडलय पाणी,
ambitions चा गळ टाकून
बसलाय अदृश्य कोणी.
home loan फेडता फेडता
home मधेच alone झालोय.
corporate targets पूर्ण करून emotionless
zone झालोय.
before forty सर्व पार करायचय distance is
so far.
थोडा break हवाय यार.
कळलच नाही कधी पाउस गेला
थंडी आली,
आणि काय काय झाले बदल,
कळलच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ.
गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत
नाही,
तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख्ख
देत नाही.
कळत नाही कधी
झालो इतका परका,
smile च्या formality मुळे प्रत्येकजण
दिसतो एक सारखा.
हा status, कि space सबकुच वाटतेय बेकार....
थोडा break हवाय यार...

No comments: