II जनाचे श्लोक - आजच्या युगातले II
विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट
व्यायाम-
प्रभाते मनी देह हा जागवावा,
पांघरुणात लोळुन, वाया न जावा
नमस्कार घालावे , सूर्यासी दहा
दिवस जातो आनंदे, मित्रानो पहा II
वॉटसएप
मना सज्जना, हाती वौट्सएप नकोरे
उतु दूध जाई, कुकर शिट्टी मारे
पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे
बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे II
बैठी जीवन शैली-
घरी यावे ऑफीस मधुनी उशिरा
टीवी बघत खावा, फास्ट फूड कचरा
सकाळी ना होई, मलाचाही निचरा
कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II
अध्यात्म-
नको रे मना, लागू भोन्दुंच्या नादी
नको अंधश्रध्धा, नको घेऊ उदी
सदुगृरू खरा तो, मनाचा विवेक
नको घालवू वेळ, हृदय सांगे ऐक II
मद्य-
मना सज्जना मद्य, भयंकर पाश
घरा राख रांगोळी, होई सर्वनाश
नको तो सुधाकर, नको तोच प्याला
सुरुवातीस एक, मग घरीच मधुशाला II
धूम्रपान-
मना सांग का ओढिशी धूम्रकांडी
फूफ़्फुसास भोके, आरोग्यही सान्डी
हृदयास झटके, व्यसन हाची रोग
आय सी युत नेई, कर्माचाच भोग II
टेंशन-
विचारी मना तुची शोधुनी पाहे
टेंशन किती या आयुश्यात आहे
उदयाचे कसे हो, मना जाळी चिंता
प्याला अमृताचा, तोही भासे रीता
किती हवा पैसा, नको धावु मागे
आयुश्य निसटले, आता व्हावे जागे II
कर्ज़-
नको रे मना, काढ़ु भले मोठे कर्ज़
गीळे जसा अजगर, दया माया वर्ज्य
पोखरी मनास, आनंदा सुरंग
जितेपणी नको तो , सोनेरी तुरंग II
फास्ट फूड-
मना सांग पा, जेवणा काय झाले ?
पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले
चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे
वजन काटा पाहुनी, मिटुन घेई डोळेII
II जय जय बुद्धीप्रामण्य समर्थ II
No comments:
Post a Comment